आमचे गांव
ग्रामपंचायत
जळगाव नहाटे हे महाराष्ट्रातील अकोला
जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील एक ऐतिहासिक व ग्रामीण गाव आहे. हे अकोटपासून सुमारे ७ कि.मी. अंतरावर आहे.
या
गावाचे सर्वात मोठे धार्मिक महत्त्व म्हणजे हे संत
नरसिंग महाराज यांचे जन्मगाव आहे. संत नरसिंग
महाराजांचा जन्म इसवी सन १८०५ मध्ये जळगाव
नहाटे येथील एका वतनदार पाटील कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पुंजाजी पाटील आणि आईचे नाव राजूबाई होते. महाराजांनी बालपणापासूनच पंढरपूर, देहू आणि आळंदीची वारी करून भक्तीचा मार्ग
स्वीकारला होता. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायाला लागलेली जखम
महाराजांनी औषध लावून बरी केली होती, अशी आख्यायिका आहे. संत नरसिंग महाराज
हे शेगावचे
संत गजानन महाराज यांचे समकालीन मोठे गुरु
बंधू होते. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी
आपल्याला प्राप्त असलेल्या अष्टमहासिद्धी शेगावच्या संत गजानन महाराजांना प्रदान केल्या होत्या, असे म्हटले जाते, संत गजानन महाराज अनेकदा अकोट येथे नरसिंग महाराजांना भेटायला येत असत.
याचा पुरावा श्री. दासगणु लिखित गजानन विजय ग्रंथामध्ये पहायला मिळतो. संत नरसिंग
महाराजांनी माघ
शुद्ध पौर्णिमा,
इसवी सन १८८७ (शके १८०९) मध्ये अकोट येथे संत गजानन
महाराजांच्या उपस्थीत्तीत जिवंत समाधी घेतली होती. दरवर्षी कार्तिक वद्य पंचमीला जन्मभूमी
जळगाव नहाटे येथे एक दिवसीय यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते आणि अकोट
येथे एक महिना भव्य यात्रा उत्सव भरतो.
भौगलिक क्षेत्रफळ: गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ७३७.७ हेक्टर (७.३७ चौ.कि.मी.) आहे.
लोकसंख्या आरोग्य
विभागाच्या माहिती नुसार २०२६च्या: गावातील एकूण
लोकसंख्या ही एकूण १३०० आहे. ज्यामध्ये ६५५ पुरुष आणि ६४५ महिलांचा समावेश होतो.
प्रशासन व सुविधा: या गावाचा कारभार लोकनियुक्त सरपंचांमार्फत पाहिला जातो. येथील प्रमुख शैक्षणिक संस्थेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र,
पोस्ट ऑफिस, व्यायाम शाळा, जळगाव नहाटे यांचा समावेश होतो.
बचत गटाच्या अंतर्गत
उद्योग: महिला बचत गटाच्या अंतर्गत शेळीपाल हा उद्योग केला जात
आहे. आणि या गटाला अकोला जिल्हातून प्रथम शेळी पालन स्वयमसिद्धा २०२६ मध्ये पुरस्कार
मिळाला आहे.
धार्मिक स्थळे: जळगाव नहाटे येथे
पुरातन मंदीर श्री हनुमान मंदीर, संत नरसिंग महाराज मंदीर, श्री विठ्ठल रुख्मिणी
मंदीर, श्री वळेखन मंदीर ही जळगाव नहाटे येथील धार्मिक स्थळे आहेत.
Explore More